महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग २)

२) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव –
महाराष्ट्रातील शेतीचा सध्या विचार केला असता आपणास असे पाहायला मिळते की, सण 1990 पर्यंतच्या काळातील शेती आणि आत्ताची शेती यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. जे पूर्वी एकरी उत्पादन होते त्यामध्ये निश्चित सुधारणा झाली आहे परंतु जे अपेक्षित कृषि उत्पादन मिळाले पाहिजे ते अद्यापही आपण ते गाठू शकलो नाही. कारण त्याची अनेक कारणे आहेत त्यापैकीच एक कारण म्हणजे माती परीक्षण-सद्या जमिनीचे माती परीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी पाच ते दहा टक्के एवढी मर्यादित आहे.माती परीक्षणामुळे जमिनीचा पी.एच. जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे प्रमाण किती आहे हे आपणास माती परीक्षणामुळे कळते व त्यानुसार आपण त्याचे व्यवस्थापन करतो परंतु याकडे शेतकरी वर्ग दुर्लक्ष करीत असल्यामुळे आपणास अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही.

Soiltesting
तसेच दुसरी बाब म्हणजे शेतकरी बियाण्याची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करणे किती आवश्यक आहे याची जाणीव नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अगदीच आपण पाहिले तर दहा ते पंधरा टक्के शेतकरीच या बीज प्रक्रियेचा अवलंब करतात बीजप्रक्रियेमुळे वरून देणाऱ्या रासायनिक खतांची बचत होते तसेच काही बुरशीजन्य रोग आपण थांबवू शकतो हे शेतकऱ्यांना अजून उमजले नाही.
त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हिरवळीची खते उदाहरणार्थ ताग धैंचा यांचा जमिनीत गाडून जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठीचा अवलंब फारच थोडे शेतकरी करीत असल्याचे आपणास आढळून येते. ताग व धैंचा यांची पेरणी करून ते 30- 40 दिवसांनी जमिनीत गाडल्यास त्याचा उपयोग जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते त्याचबरोबर नत्र स्फुरद व पालाश यांचे जमिनीतील प्रमाण सुद्धा वाढलेले आपणास दिसते. या बाबीकडे बहुतांश शेतकरी अद्यापही दुर्लक्ष करतात त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
पिकांची पेरणी किंवा लागवड करताना त्या पिकास शिफारशीनुसार रासायनिक खतांचा तसेच सेंद्रिय खतांचा हप्ता योग्य प्रमाणात देत नसल्याने पिकांचे उत्पादन कमी येत असल्याचे आपल्या आढळते. रासायनिक खतांचा वापर हा शिफारशीनुसार व विभागून दिल्यास त्याचा उत्पादन वाढीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो परंतु शेतकरी बेसल डोस देतच नाहीत पीक एक महिन्याचे झाल्यानंतर खते दिले जातात आणि तीही नत्रयुक्त युरिया या खताचा वापर जास्त केलेला आढळतो. त्याचबरोबर इतर जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांचाही वापर फार कमी प्रमाणात केला जातो त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळालेले दिसत नाही.

Urea Spreding
पीक उत्पादनात पाण्याचे योग्य व्यवस्थापन या बाबीचा सुद्धा योग्य प्रकारे उपयोग करणे गरजेचे असते हंगामणीहाय, पिकनिहाय दिवसाला किती पाणी लागते याचे तंत्र शेतकऱ्यांच्या कडे उपलब्ध नाही उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार ठिबक सिंचन सारख्या तंत्राचा वापर केल्यास कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घेता येते परंतु ठिबक सिंचन वापरणारे शेतकरी फक्त पंधरा ते वीस टक्केच आपणास आढळून येतात त्यामुळे पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
पीक संरक्षणाचा विचार केला असता कीड किंवा रोग पिकावर येऊच नये या पूर्व नियंत्रित बाबीकडे शेतकरी दुर्लक्ष करतात तसेच कीड आहे का रोग आहे याचे ज्ञान न झाल्यामुळे दुकानदार सांगेल ते औषध शेतकरी आपल्या पिकावर फवारतात,त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आर्थिक तोटा होतो.

– श्री.दयानंद बनसोडे

    Bsc.Agri.

   निवृत्त कृषी अधिकारी

आपले विचार कळवा

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top