
५ ) पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग–
या विभागात धुळे, सातारा, सांगली पुणे, नाशिक,कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भाग समाविष्ट होतो. या विभागाचे पर्जन्यमान ९५० ते १२५० मी.मी. एवढे असुन डिसेंबर – जानेवारीत किमान ५ °C व एप्रील, मे महिन्यात ४० °C एवढे कमाल तापमाण असते. या विभागात खरीपमध्ये ज्वारी, बाजरी, भुईमुंग , तुर, गुग, उडीद, सोयाबीन, घेवडा, इत्यादि पिके घेतली जातात, तर रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा हि पिके आणि ऊस पिकाची मोठी लागवड केली जाते. तसेच सर्वप्रकारचा भाजीपाला व फळपिके लागवड केली जातात.
६ ) पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा विभाग–
या विभागात संपुर्ण सोलापुर तर अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, धुळे, जळगाव, नाशीक, बुलढाणा, औरंगाबाद, बिड, उस्मानाबाद, आणि लातूर या जिल्ह्यांचा काही भाग समाविष्ठ आहे. या ठिकाणचे सरासरी पर्जन्यमान ७५० मी.मी पेक्षा कमी असुन त्याची विभागणी असमाण आहे. जुन, जुलै व सप्टेंबर मधे पाऊस अधिक पडतो. या ठीकाणचे तापमाण किमान १४ ते १५ °C व कमाल ४० ते ४१ °C एवढे असते. या ठिकाणचे ७०-७५% एवढे क्षेत्र रब्बी असुन ज्वारी, करडई, सुर्यफुल, हरभरा यासारखी पिके घेतली जातात. खरीपात बाजरी, भुईमुंग, तुर, मुग, उडीद, सुर्यफुल हि पिके घेतली जातात.
७ ) मध्यमहाराष्ट्र पठारी विभाग –
या विभागात जळगाव, लातुर, धुळयाचा काही भाग, सोलापुर, बिड, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्हयांचा समावेश होतो. याठिकाणी ७५० ते ९५० मी. मी. एवढा वार्षिक सरासरी पाऊस पडत असून ७५% पाऊस खरीप हंगामात पडतो. याठिकाणी खरिपमध्ये ज्वारी, कापुस, सुर्यफुल, भुईमुंग, सोयाबीन, मुग, उडीद ही पिके घेतली जातात. तर रब्बीमध्ये गहू, हरभरा, कापूस ही पिके घेतली जातात.
८) मध्य विदर्भ विभाग–
या विभागात वर्धा व नागपुरचा काही भाग, चंद्रपुर, औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड व यवतमाळचा काही भाग येतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५० ते १२५० मी. मी असून जमिनी काळीकसदार व खोल आढळतात. खरीपमेध कापुस, ज्वारी, तुर, मुग गळीतधान्य तर रब्बीमध्ये गहु, ज्वारी, हरभरा हि पिके घेतली जातात.
९ ) पूर्व विदर्भ विभाग –
या विभागात भांडारा व गडचिरोली जिल्हे व चंद्रपुरचा व नागपूरचा काही भाग समाविष्ट होतो. या विभागाचे पर्जन्यमान १२०० ते १७०० मी. मी. असुन याठिकाणी भात हे महत्वाचे पिक आहे. रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, जवस, गहू ही पिके घेतली जातात.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी