महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -१)

Agriculture
महाराष्ट्र राज्य है उष्ण कटीबंधात असल्याने एथील हवामान हे बहुतांशी समशितोष्ण व कोरडे आढळेत राज्याला मिळणारा पाऊस हा मुख्यत्वेकरून नैरित्य मोसमी वाऱ्याापासून मिळतो. आणि पूर्व भागात इशान्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो. महाराष्ट्राचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ७५० मी.मी इतके आहे. उन्हाळ्यातील तापमान ४५ °C पर्यंत तर हिवाळ्यातील तापमान ५ – १०°C पर्यंत खाली येते.  हवेतील आद्रतेचे प्रमाण सकाळी ५० ते ९०% पर्यंत तर दूपारी 20 ते ६०% पर्यंत असते.  वरील सर्व बाबींचा विचार करुण खालील प्रमाणे महाराष्ट्राचे ९ कृषि हवामान विभाग आहेत. 
 
१ ) दक्षीण कोकण किनारपट्टी विभाग – 
या विभागात रत्नागिरी, रायगड  व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असुन येथील सरासरी पर्जन्यमान हे ३१०० मी.मी. एवढे आहे . याठिकाणी जमीन हि जांभ्या खड‌कापासून तयार झाली असून येथे भात व नागली हि पिके प्रामुख्याने घेतली जातात व आंबा, काजु हि फळपीके घेतली जातात.
 
२) उत्तर कोकण किनारपट्टी विभाग – 
या विभागात मुख्यत्वे ठाणे जिल्हा आणि रायगडचा उर्वरीत भाग समाविष्ठ असुन याठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे २६०० मी. मी.आहे. या विभागात भात नागली वरई, ही पिके तर चिकू, आंबा हि फळपिके घेतली जातात.
 
३ ) पश्चिम घाट विभाण
हा विभाग म्हणजे सहयाद्री पर्वताच्या डोंगरमाथ्यांवरील दक्षीण-उत्तर असा चिंचोळा पट्टा असून याअंतर्गत अंबोली, फोंडा, कोल्हापुर, महाबळेश्वर, लोणावळा खंडाळा, कळसुबाई, इगतपूरी व त्र्यंबकेश्वर हे भाग येतात. या  भागामधे २० – २५% जंगल असून या ठिकाणी सरासरी ५००० मी.मी एवढा पाऊस पडतो. था भागात भात, नागली  या प्रकारची पिके घेतली जातात.
 
४ ) उपपर्वतीय विभाग
या विभागामधे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावरील प्रदेश येतो, यात पुणे, नाशिक, सातारा, सांगली  व कोल्हापुरचा पश्चीमेकडील भाग समावीष्ठ होतो. या विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १७०० ते २५०० मी.मी. असून कमाल तापमान २८-३५°C एवढे व किमान तापमाण – १४ ते १६°C एवढे असते.  या  विभागात प्रामुख्याने भात, नागली , ज्वारी, बाजरी, भुईमुंग हि खरीपाची  पिके तर रब्बी मध्ये ज्वारी,गहू, हरभरा, वाल तसेच ऊस हि पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे भाजी पाला पीके व कांदा, बाटाटा, मीरची, टोमॅटो, वांगी ही पिके तर द्राक्ष, आंबा हि फळपिके घेतली जातात.
 

– श्री.दयानंद बनसोडे

    Bsc.Agri.

   निवृत्त कृषी अधिकारी 

1 thought on “महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -१)”

  1. Satish Shirsat

    माझ्यासारख्या शहरात राहणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या मार्फत एवढी अभ्यासपूर्ण..आपण अभ्यास करून मिळवलेली माहिती मिळते आहे यामुळे आमचं शेतीविषयक ज्ञान तर वाढतच आहे.
    पण त्यासोबत शेतकरी वर्गाबद्दल देखील मनात आदर निर्माण होत आहे..
    आपण दिलेल्या माहितीचा नक्कीच तरुण वर्गाला उपयोग होणार आहे व मुलांच्या मनात शेतीविषयक अभ्यासक्रम घेऊन भविष्यात कृषिविभागात काम करण्यासाठी किंवा आधुनिक शेती करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
    आपण आपलं लिखाण असंच पुढे चालू ठेवावं याच आपल्याला मनापासून शुभेच्छा!!
    धन्यवाद बनसोडे सर ❤️🙏🏻

आपले विचार कळवा

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top