
भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारत हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन विभागात जोडला जातो शहरी भागात कारखाने, औद्योगीक संस्था, व्यापार, शिक्षण, छोट्यामोठ्या स्वयंसेवी संस्था इत्यादी घडामोडी चालतात तर ग्रामीण भागामध्ये शेती हाच प्रामुख्याने व्यवसाय असल्याने यावरच आधारित शेतीशी निगडीत छोटेमोठे उद्योग व्यवसाय चालतात. भारताच्या एकुण लोकसंख्येच्या जवळपास ७०% लोकसंख्या हि ग्रामीण भागात राहते तर ३०% च्या जवळपास शहरी भागात राहते.
- शहरी भागात रहाणारी ३०% लोकसंख्या हि प्रामुख्याने मध्यमवर्गात मोडली जाते आणि ह्यांच्या औद्योगीक क्षेत्र, उद्योग, व्यवसाय, लघुउद्योग, शिक्षण संख्या इत्यादी क्षेत्रात नोकरी करून त्यावर चारीतार्थ चालतो. त्यांना त्यामानाने दैनंदिन जीवन जगण्यासाठी अनेक क्षेत्रे व संधी उपलब्ध होतात त्यामुळे त्यांचे जीवनमान ग्रामीण भागापेक्षा तुलनेत चांगले असेत. मुलांना शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी लवकर उपलब्ध होतात. त्यामुळे भारतातील लहान, माध्यम व मोठी शहरे यांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने विकास चांगल्याप्रकारे झाला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील लोकसंख्या ही शहरीभागाकडे दिवसेंदिवस आकृष्ट होत चालली आहे , व शहरांची भौगोलीक क्षेत्रे त्यामुळेच वाढत असलेली दिसतात, लोकसंख्येची घनता सुधा वाढताना दिसते.
- ग्रामीण भारताचा विचार केला असता ७०%च्या आसपास लोकसंख्या तेथे राहते आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि शेतीशी निगडित जोडव्यवसाय आहे. शेती हा व्यवसाय डोंगरी, पठारी व सखल भागात विभागला असुन त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार व उपलब्ध पायाभूत सुविधा व साधनसामुग्रीनुसार शेतीचा, जोडधंद्याचा विकास झालेले आढळते. शेती हा व्यवसाय मुख्यत्वेकरून तेथे पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार केला जातो.डोंगरी भागाचा विचार करता तेथे जमीनीची प्रत ही मध्यम ते हल्की असते तसेच तेथे पाण्याची सिंचनाची उपलब्धता सुद्धा मर्यादित असते तसेच पायाभुत सुविधा यासुद्धा मर्यादित असल्याने शेती हा व्यवसाय म्हणुन विकसित होण्यास मर्यादा येतात. पावसावर येणारी ठराविक पिके यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
- पठारी भागामध्ये सपाट किंवा थोड्याफार प्रमाणात उंच सखल प्रदेश येतो आणि याच ठिकाणी शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे केला जातो परंतु या प्रदेशात सुध्दा कमी पावसाचा, मध्यम पावसाचा विभाग आढळला जातो, याठिकाणी आवर्षणप्रवण भागात (कमी पावसाचा प्रदेश) फक्त पावसामुळे कमी जास्त प्रमाणात मिळणाऱ्या पाण्यावर शेती केली जाते तर हमखास पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रात त्या-त्या पद्धतीने शेती केली जोत. भारतामध्ये जमिनीची भौगोलीक स्थीती, तेथील जमिनीची वर्गवारी, उपलब्ध पावसाचे प्रमाण, पायाभूत सुविधा यानुसार शेतीचे, पिकांचे प्रकार केले जातात.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी
Nice Informative Blog
Hello, I really like this blog